माजी भारतीय ट्रॅप नेमबाज राजेश्वरी कुमारी यांची २०२६-२०३० या कालावधीसाठी दक्षिण आशियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी 'ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (Olympic Council of Asia - OCA)' ॲथलीट्स कमिशनच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • २० व्या आइचि-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ दरम्यान झालेल्या ॲथलीट्स समितीच्या निवडणुकांनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
  • यापूर्वी उपाध्यक्ष पदावर आम करणाऱ्या शिवा केशवन यांच्यानंतर या आयोगावर काम करणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.

राजेश्वरी कुमारी यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • त्यांनी २०१४ पूर्वी ट्रॅप शूटिंगमधील कारकीर्द सुरू करत पंजाबमधील पटियाला येथे झालेल्या २०१४ च्या राष्ट्रीय शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
  • चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (स्पर्धा पुढे ढकलून २०२३ मध्ये आयोजित करण्यात आल्या) त्यांनी महिलांच्या ट्रॅप सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
  • २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत त्यांनी महिलांच्या ट्रॅप प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत २२ वे स्थान मिळवले होते.

OCA बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): OCA म्हणजेच Olympic Council of Asia अर्थात 'ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया' होय.
  • स्थापना वर्ष: १६ नोव्हेंबर १९८२ रोजी नवी दिल्ली, भारत येथे OCA ची स्थापना करण्यात आली होती.
  • कायमस्वरूपी मुख्यालयाचे ठिकाण: कुवेत सिटी, कुवेत येथे OCA चे कायमस्वरूपी मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या ४५ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या OCA च्या सदस्य आहेत.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या महामहिम शेख जोआन बिन हमद अल थानी (कतार) हे OCA च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.