नुकतीच भारतीय महिला क्रिकेट संघाची आघाडीची फलंदाज पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ठळक मुद्दे:

  • पूनम राऊत हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून त्वरित निवृत्ती जाहीर केली आहे.
  • तिची कारकीर्द २००९ साली सुरू झाली होती. 
  • तिने आपल्या कारकिर्दीत म्हणजेच २००९ पासून २०२१ या कालावधीत ४ कसोटी, ७३ एकदिवसीय आणि ३५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

पूनम राऊत बाबत महत्वपूर्ण माहिती:

३ फॉरमॅट मधील कामगिरी:

  • एकदिवसीय क्रिकेट: ३४.८३ च्या सरासरीने २,२९९ धावा (३ शतके आणि १५ अर्धशतके)
  • कसोटी क्रिकेट: ४ कसोटी सामन्यांत ४४ च्या सरासरीने २६४ धावा
  • टी-२०क्रिकेट: २७.६५ च्या सरासरीने ७१९ धावा (४ अर्धशतके)

उल्लेखनीय खेळी:

  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने २०१४ मध्ये १३० धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.
  • २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात तिने ३६ आणि ४१ (अबाधित) धावा करत हा सामना अनिर्णित राखला होता.
  • मे २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे आयर्लंडविरुद्ध पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा यांनी सलामीला ३२० धावांची भागीदारी करत महिला एकदिवसीय क्रिकेटमधील एक विक्रम नोंदविला होता.

विश्वचषक सहभाग:

  • ३ एकदिवसीय विश्वचषक - (२००९, २०१३ आणि २०१७) 
  • ४ टी-२० विश्वचषक - (२००९, २०१०, २०१२ आणि २०१४)