नुकताच भारतीय समाजसेविका आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या ‘रीमा नानावटी’ यांना ‘हिलरी रॉडहॅम क्लिंटन पुरस्कार (Hillary Rodham Clinton Award)’ प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- ‘सेल्फ-एम्प्लॉइड विमेन्स असोसिएशन (SEWA - सेवा)' च्या संचालिका आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या रीमा नानावटी यांना, अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी. येथील ‘जॉर्जटाउन इन्स्टिट्यूट फॉर विमेन, पीस अँड सिक्युरिटी (Georgetown Institute for Women, Peace and Security)' द्वारे ‘हिलरी रॉडहॅम क्लिंटन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
- महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, उपजीविकेची साधने, तसेच शांतता आणि सुरक्षेच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
- २०१३ मध्ये सामाजिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती:
- हा पुरस्कार २०१४ मध्ये सुरू झाला होता.
- सदर पुरस्कार हा अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते (GIWPS च्या माध्यमातून) प्रदान करण्यात येतो.
इतर विजेते:
- टोरी बर्च - फॅशन डिझायनर आणि ‘टोरी बर्च फाउंडेशन’च्या संस्थापक
- मुहम्मद युनूस - नोबेल शांतता पारितोषिक विजेते (२००६) तसेच ‘ग्रामीण बँक’चे संस्थापक आणि बांगलादेश सरकारच्या माजी मुख्य सल्लागार