नुकतेच GRSE कोलकाता येथे भारतीय नौदलाच्या ‘श्रुती’ (Shruti) या NGOPV चे जलावतरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (Garden Reach Shipbuilders & Engineers - GRSE)' ने कोलकाता येथील आपल्या गोदीत नुकतीच भारतीय नौदलासाठीच्या 'पुढील पिढीची सागरी गस्त नौका' (Next Generation Offshore Patrol Vessel - NGOPV) मालिकेतील दुसरी नौका 'श्रुती' (Shruti) जलावतरित केली.
  • भारतीय नौदलासाठी महत्वाची असणारी आणि 'यार्ड ३०३७' (Yard 3037) असे नामकरण करण्यात आलेली ही नौका ११ NGOPV जहाजांच्या मोठ्या मालिकेचा भाग म्हणून बांधली जात आहे.
  • नौदलाच्या जहाजांचे स्वदेशीकरण करणे आणि सागरी पाळत ठेवण्याच्या क्षमतेत वाढ करणे या भारताच्या प्रयत्नांमधील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
  • भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय आणि GRSE चे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी जलावतरण समारंभास उपस्थित होते.