भारतीय नौदलामार्फत नुकताच फ्रान्समधील 'वरुण (VARUNA)' सरावाच्या २४ व्या आवृत्तीत सहभाग घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय नौदलाची युद्धनौका 'आयएनएस त्रिशूल (INS Trishul)' फ्रान्सच्या नौदलासोबतच्या 'वरुण (VARUNA)' या द्विपक्षीय सागरी सरावाच्या २४ व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी फ्रान्समधील तुलॉन येथे पोहोचली आहे.

'वरुण' (VARUNA) सरावाबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्यात आयोजित केला जाणारा हा द्विपक्षीय सागरी सराव आहे.
  • या सरावाची यंदाची २४ वी आवृत्ती फ्रान्सद्वारे आयोजित केली जात आहे. 
  • आलटून-पालटून भारत आणि फ्रान्सच्या किनारपट्टीवर हा सराव आयोजित केला जातो.
  • १९९३ मध्ये हा द्विपक्षीय नौदल सराव सुरू झाला होता आणि २००१ मध्ये त्याला 'वरुण' असे नाव देण्यात आले होते.
  • याचे आयोजन भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या फ्रेंच नौदलाच्या 'तुलॉन नौदल तळावर' केले जात आहे.