नुकतेच भारतीय नौदलामार्फत नवी दिल्ली येथे 'इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद (Indo-Pacific Regional Dialogue)' २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे:
- नॅशनल मेरिटाइम फाउंडेशनच्या सहकार्याने भारतीय नौदलाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ३ दिवसीय संवादाचे आयोजन संपन्न केले.
- मानेकशॉ सेंटर, नवी दिल्ली येथे या ८ व्या आवृत्तीचा समारोप करण्यात आला आहे.
- सदर संवाद हा ‘इंडो-पॅसिफिकमधील विज्ञान, तंत्रज्ञान तसेच शैक्षणिक सहकार्य’ यावर केंद्रित होता.
- यामध्ये २० देशांतील ४० हून अधिक तज्ञांनी सहभाग घेतला होता.