भारतीय नौदलामार्फत नुकतेच दुसरे स्वदेशी 'डायव्हिंग सपोर्ट वेसल (Diving Support Vessel - DSV)' ‘निपुण’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारतीय नौदलामार्फत मुंबई येथील नौदल गोदीत नौदल प्रमुख (Chief of the Naval Staff - CNS) ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या उपस्थितीत आपले दुसरे डायव्हिंग सपोर्ट वेसल (DSV) ‘निपुण’ कार्यान्वित करण्यात आले आहे.
  • ‘निपुण’ या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ ‘कुशल आणि निष्णात’ असा होतो.
  • ‘भारतीय जहाज नोंदणी ’ (Indian Register of Shipping - IRS) मानकांनुसार सदर जहाज बांधण्यात आले आहे.

‘निपुण’ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  •  ३० जुलै २०२६ रोजी विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे ‘हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड’ द्वारे डिझाइन आणि निर्मिती करण्यात आलेले ‘निपुण’ जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.
  • जवळपास ७५% स्वदेशी घटकांचा वापर करण्यात ‘निस्तार (Nistar)' वर्गातील या जहाजामुळे संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेला चालना मिळाली आहे.
  • पाण्याखालील पायाभूत सुविधांची तपासणी, देखभाल आणि दुरुस्ती करण्यासही हे जहाज मदत करते.
  • याची लांबी सुमारे ११८ मीटर असून त्याचे विस्थापन (Displacement) सुमारे ८,५०० टन इतके आहे.
  • संकटात सापडलेल्या पाणबुड्यांमधून कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘निपुण’ हे  मुख्य आधारभूत जहाज म्हणून कार्य करते.

भारतीय नौदलाविषयी (IN) महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): IN म्हणजेच Indian Navy अर्थात भारतीय नौदल होय.
  • स्थापना वर्ष:  १६१२ मध्ये IN ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत प्रमुख: सध्या ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन हे भारतीय नौदलाच्या प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
  • बोधवाक्य: 'शं नो वरुणः (May the Lord of Water be auspicious to us - जलाचे अधिपती - वरुण देव - आमच्यासाठी कल्याणकारी असोत' हे भारतीय नौदलाचे बोधवाक्य आहे.