भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने नुकतेच पहिले 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ (Saint Louis Rapid & Blitz)' विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकेतील मिसूरी येथील सेंट लुईस येथे झालेल्या स्पर्धेत, भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने उझबेकिस्तानच्या जावोखिर सिंदारोव्हला मागे टाकत आपले पहिले 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' विजेतेपद जिंकले.
  • प्रज्ञानंदने रॅपिड विभागात विजय मिळवून आणि ब्लिट्झ प्रकारात आपली आघाडी कायम राखून स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.

'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' बद्दल थोडक्यात माहिती:

  • ही 'ग्रँड चेस टूर'च्या (Grand Chess Tour - GCT) ११ व्या आवृत्तीतील ही चौथी फेरी होती.
  • 'सेंट लुईस चेस क्लब' हा 'सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ' स्पर्धेचा मुख्य आयोजक आणि यजमान आहे.
  • ९ फेऱ्यांची रॅपिड स्पर्धा आणि त्यानंतर १८ फेऱ्यांची ब्लिट्झ स्पर्धा असे या स्पर्धेचे स्वरूप होते.