भारतीय तटरक्षक दलामार्फत नुकतेच ओडिशाच्या किनारपट्टीवर राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सराव ‘SAREX-2026’ चे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • संरक्षण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांनी या १२ व्या राष्ट्रीय सागरी शोध आणि बचाव सरावाचे उद्घाटन केले आहे.
  • भारतीय तटरक्षक दलामार्फत ओडिशातील पारादीप किनारपट्टीवर हा सराव आयोजित करण्यात आला आहे.
  • सागरी शोध आणि बचाव कार्यासाठी समन्वित सज्जता बळकट करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.