भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर प्रणेश एम याने नुकतेच हंगेरीमध्ये पार पडलेल्या 'कनिझा ओपन (Kanizsa Open) २०२६' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
ठळक मुद्दे:
- तामिळनाडूच्या कराईकुडी येथील १९ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने हंगेरीमधील नागीकनिझा येथे पार पडलेल्या 'कनिझा ओपन २०२६' स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
- त्याने ९ फेऱ्यांतून ७ गुण मिळवत नवव्या आणि अंतिम फेरीत जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीचा पराभव केला.
- नागीकनिझा येथील 'कनिझा एरिना' येथे सदर स्पर्धा ही १५ ते २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
प्रणेश एम याच्याबद्दल महत्वपूर्ण माहिती:
- विशेष कामगिरी: प्रणेश एम याने २०१९ मध्ये 'इंटरनॅशनल चेस फेडरेशन मास्टर [International Chess Federation (FIDE) Master], २०२० मध्ये 'इंटरनॅशनल मास्टर' (International Master - IM) आणि २०२३ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी 'ग्रँडमास्टर' हे किताब मिळवले आहेत.
- 'ग्रँडमास्टर' किताब मिळवल्यानंतर, त्याने २०२३ सालच्या सर्बियामधील 'सिल्व्हर लेक ओपन' आणि आर्मेनियामधील 'त्साघकादझोर ओपन' मध्ये संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले.
- २०२५ मध्ये 'चेन्नई ग्रँड मास्टर्स' स्पर्धेच्या 'चॅलेंजर्स' विभागात विजय मिळवला.
- FIDE मानांकनमध्ये प्रणेश जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानावर पोहोचला आहे.