नुकतेच भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने 'कुमामोटो मास्टर्स जपान (Kumamoto Masters Japan) २०२६' मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

ठळक मुद्दे:

  • १० ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान सदर स्पर्धा ही जपानमधील कुमामोटो प्रीफेक्चरल जिम्नॅशियम येथे आयोजित करण्यात आली होती.
  • लक्ष्य सेनने अंतिम सामन्यात जपानच्या कोकी वातानाबेचा पराभव करत विजय संपादन केला आहे.
  • या विजायासह दिमाखदार कामगिरी करताना तो २०२३ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.