भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. करीम मरेडिया यांना नुकताच २०२६ चा 'बोरलॉग CAST संवाद पुरस्कार (Borlaug CAST Communication Award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- 'कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेमार्फत (Council for Agricultural Science and Technology - CAST)' भारतीय-अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ डॉ. करीम मरेडिया यांना 'बोरलॉग CAST संवाद पुरस्कार' विजेते म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
- १० डिसेंबर २०२६ रोजी अमेरिकेतील आयोवा येथील 'लायब्ररी काँग्रेस'मध्ये सदर पुरस्कार डॉ. मरेडिया यांना अधिकृतपणे प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. करीम मरेडिया यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- डॉ. मरेडिया हे अमेरिकेतील 'मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये Michigan State University (MSU)' 'जागतिक कृषी केंद्राचे (World Agriculture Center - WAC)' सह-अधिष्ठाता आणि संचालक (Associate Dean and Director) आहेत.
- मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील ३० वर्षांहून अधिक कालावधीत त्यांनी 'जागतिक ज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवेश कार्यक्रम (World Knowledge and Technology Access Program - WorldTAP)' सुरू केला होता.
- त्यांनी १३० प्रकाशनांसाठी संशोधन लेख/पुस्तके लिहिली तसेच स्पर्धात्मक अनुदानातून ५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त निधी मिळवला आहे.