नुकतेच भारताने गांधीनगरमध्ये 'वर्ल्ड सर्क्युलर इकॉनॉमी फोरम (World Circular Economy Forum - WCEF) २०२६' चे यजमानपद भूषविले आहे.
ठळक मुद्दे:
- १५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत यंदाच्या २०२६ सालच्या या फोरमचे आयोजन गांधीनगरमध्ये करण्यात आले होते.
- दक्षिण आशियात होणारा हा अशा प्रकारचा हा पहिलाच फोरम होता.
- संकल्पना / थीम (Theme): 'चक्रीय अर्थव्यवस्था: लोक आणि समृद्धीसाठी संक्रमण (Circular Economy: Transition for People and Prosperity)' ही यंदाच्या फोरमची संकल्पना आहे.
- ६५ हून अधिक देशांतील २,००० हून अधिक प्रतिनिधी यात आपला सहभाग दर्शवून सर्क्युलर इकॉनॉमीशी संबंधित प्रत्यक्ष उपाय, गुंतवणूक तसेच धोरणात्मक बाबींवर चर्चा करतील.
- आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासोबतच भारताच्या सर्क्युलर इकॉनॉमीविषयक प्रयत्नांना चालना देणे हा या फोरमचा मुख्य उद्देश आहे.