भारत पहिल्यांदाच 'युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल (Union Cycliste Internationale - UCI) रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप्स २०३२' चे यजमानपद भूषवणार आहे.
ठळक मुद्दे:
- कॅनडातील मॉन्ट्रियल येथे झालेल्या 'युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल'च्या (UCI) १९५ व्या काँग्रेसमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.
- यानुसार भारतातील पुणे, महाराष्ट्र ला 'यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप्स २०३२' चे यजमानपद मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र सरकार आणि 'सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया' (CFI) यांनी संयुक्तपणे सदर ऐतिहासिक बोलीचे नेतृत्व केले होते.
'यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप्स २०३२' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- सायकलिंगमधील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी ही एक आहे.
- अव्वल दर्जाचे 'रोड सायकलिंग'पटू यात सहभागी होतात.
UCI बाबत महत्वपूर्ण माहिती:
- स्थापना वर्ष: १९०० मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे UCI ची स्थापना झाली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: एगल, स्वित्झर्लंड येथे UCI चे मुख्यालय स्थित आहे.
- वैशिष्ट्य: ही सायकलिंग खेळाची जागतिक स्तरावरील प्रशासकीय संस्था आहे.
- मुख्य जबाबदारी: स्पर्धात्मक सायकलिंगचे नियमन करणे तसेच प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे ही या संस्थेची मुख्य जबाबदारी आहे.