आइची-नागोया, जपान येथे झालेल्या 'वुशू फेडरेशन ऑफ आशिया'च्या (Wushu Federation of Asia - WFA) अधिवेशनातील निर्णयानुसार भारत २०२८ मध्ये पहिल्यांदाच 'आशियाई वरिष्ठ वुशू चॅम्पियनशिप (Asian Senior Wushu Championships)'चे यजमानपद भूषवणार आहे.

ठळक मुद्दे:

  • आइची-नागोया, जपान येथे झालेल्या 'वुशू फेडरेशन ऑफ आशिया'च्या (Wushu Federation of Asia - WFA) अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्यानुसार २०२८ मध्ये भारत ११ व्या 'आशियाई वरिष्ठ वुशू चॅम्पियनशिप'चे यजमानपद भूषवणार आहे.
  • यासोबतच 'वुशू असोसिएशन ऑफ इंडिया'चे (Wushu Association of India - WAI) भूपेंद्र सिंग बाजवा यांची WFA च्या कार्यकारी समिती सदस्य पदावर निवड करण्यात आली आहे.

'आशियाई वरिष्ठ वुशू चॅम्पियनशिप २०२८' बाबत महत्वाची माहिती:

  • सदर स्पर्धेत ४२ आशियाई देशांमधील सुमारे ५०० खेळाडू तसेच प्रशिक्षक, पंच, तांत्रिक अधिकारी आणि क्रीडा प्रशासक सहभागी होतील.
  • मागील १० वी 'आशियाई वुशू चॅम्पियनशिप' आवृत्ती ही मकाऊ, चीन येथे १२ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

'वुशू' क्रीडा प्रकाराबाबत महत्वाची माहिती:

  • एक चिनी मार्शल आर्ट आणि लढाऊ क्रीडा प्रकार (कॉम्बॅट स्पोर्ट) म्हणून वुशू प्रसिद्ध आहे.
  • जागतिक स्तरावर 'इंटरनॅशनल वुशू फेडरेशन (International Wushu Federation - IWUF)' द्वारे त्याचे नियंत्रण करण्यात येते.