भारतामार्फत २०२७ मध्ये गोव्यात ४ थी कनिष्ठ (Junior) आणि ११ वी वरिष्ठ (Senior) 'आशियाई पेनकॅक सिलाट चॅम्पियनशिप (Asian Pencak Silat Championship)' आयोजित करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे:
- गोव्यातील मनोहर पर्रीकर स्टेडियमवर ४ थी कनिष्ठ आणि ११ वी वरिष्ठ आशियाई पेनकॅक सिलाट चॅम्पियनशिप भारत आयोजित करणार असल्याचे 'इंडियन पेनकॅक सिलाट फेडरेशनमार्फत (Indian Pencak Silat Federation - IPSF)' जाहीर करण्यात आले आहे.
- १९ ते २३ एप्रिल २०२७ या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
- या चॅम्पियनशिपला 'आंतरराष्ट्रीय पेनकॅक सिलाट फेडरेशनची (International Pencak Silat Federation - PERSILAT)' अधिकृत मान्यता मिळाली असून याचा भारत यजमान देश असेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
चॅम्पियनशिपबाबत महत्वपूर्ण माहिती:
- क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला तसेच सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देणे हा या चॅम्पियनशिपचा मुख्य उद्देश आहे.
- सदर स्पर्धा ही 'PERSILAT' च्या नियमांनुसार आयोजित करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.
- संपूर्ण आशियातील अव्वल कनिष्ठ आणि वरिष्ठ पेनकॅक सिलाट खेळाडू यामध्ये सहभागी होतील.
- सदर स्पर्धेमुळे भारतात पेनकॅक सिलाट खेळाचा प्रसार होईल तसेच भारतीय खेळाडूंना आपल्याच देशात आशियातील अव्वल खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
IPSF बाबत महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): IPSF म्हणजेच 'Indian Pencak Silat Federation' अर्थात 'इंडियन पेनकॅक सिलाट फेडरेशन' होय.
- स्थापना वर्ष: मोहम्मद इक्बाल यांनी २०१२ मध्ये IPSF ची स्थापना केली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे IPSF चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या किशोर प्रकाश येवले हे IPSF च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.