भारत २०२९ ची 'आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Men’s Champions Trophy)' आयोजित करणार असून बांगलादेशसोबत मिळून २०३१ चा 'एकदिवसीय विश्वचषकही (One Day International World Cup)' आयोजित करणार आहे.
ठळक मुद्दे:
- बाली, इंडोनेशिया येथे झालेल्या बैठकीत ICC बोर्डामार्फत २०३५ पर्यंतच्या प्रमुख पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक मंजूर करण्यात आले आहे.
- सदर बैठकीतील निर्णयानुसार भारत ९ ते २८ ऑक्टोबर २०२९ या कालावधीदरम्यान 'ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी'चे आयोजन करेल.
- भारतात २००६ नंतर प्रथमच ही स्पर्धा परतत आहे.
- यासोबतच भारत बांगलादेशसोबत मिळून ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर २०३१ या कालावधीत 'आयसीसी पुरुष वनडे (ODI) विश्वचषक'चे सह-आयोजन करणार आहे.
- भारताने याआधी २०२३ मध्ये या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.