नुकतीच भारत आणि अमेरिका यांच्यातील ‘एक्सरसाइज टायगर ट्रायम्फ (Exercise Tiger Triumph)’ या द्विपक्षीय त्रि-सेवा मानवी सहाय्य आणि आपत्ती निवारण सराव मालिकेच्या ५ व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर सराव आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील 'मॅरिटाइम वॉरफेअर सेंटर' मध्ये सुरू झाला आहे.
  • सदर सराव सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी 'ईस्टर्न फ्लीट'चे रिअर ॲडमिरल विशाल बिष्णोई (फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौदल) आणि रिअर ॲडमिरल जोकिन जे. मार्टिनेझ डी पिनिलोस (व्हाइस कमांडर, 'पॅसिफिक फ्लीट', अमेरिका) उपस्थित होते.
  • मोठ्या प्रमाणावरील आपत्ती निवारण मोहिमांदरम्यान दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील संयुक्त नियोजन, समन्वय तसेच परस्पर कार्यक्षमता अधिक बळकट करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.