नुकतीच भारत आणि मलेशिया यांच्यामध्ये 'उदार शक्ती २०२६ (Udara Shakti 2026)' सरावास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • मलेशियातील सेलंगोर येथील सुबांग एअर बेसवर भारतीय वायुसेना (Indian Air Force - IAF) आणि रॉयल मलेशियन एअर फोर्स (Royal Malaysian Air Force - RMAF) यांनी 'उदार शक्ती २०२६' हा द्विपक्षीय सराव सुरू केला आहे.
  • १० ते १४ ऑगस्ट या कालावधीत हा सराव आयोजित करण्यात आला आहे. 
  • दोन्ही वायुसेनांमधील परस्पर कार्यक्षमता, परिचालन समन्वय आणि संरक्षण सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता.
  • सदर सरावाचे उद्घाटन RMAF चे सराव संचालक कर्नल शम्सुल शाहरीन बिन ईसा आणि IAF चे सराव संचालक ग्रुप कॅप्टन पारिजात झा यांच्या हस्ते संपन्न झाले.
  • भारताचे संरक्षण सल्लागार कर्नल प्रवीण सुकुमारन हे देखील यावेळी उपस्थित होते.