नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल ३-पोझिशन (3P) सांघिक प्रकारात भारताने रौप्य पदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- तिलोत्तमा सेन आणि विदर्सा विनोद या वैयक्तिक अंतिम फेरीसाठीही पात्र ठरल्या आहेत.
- तिलोत्तमा सेन, विदर्सा विनोद कोचालुमकाल आणि आशी चौकसे यांनी पात्रता फेरीत एकत्रितपणे १७६३ गुण मिळवले.
- या ३ भारतीय नेमबाजांचे 'नीलिंग' (गुडघ्यावर बसून), 'प्रोन' (पोटावर झोपून) आणि 'स्टँडिंग' (उभे राहून) अशा ३ प्रकारांमधील गुण एकत्रित करण्यात आले आहेत जे अंतिम निकालासाठी ग्राह्य धरले जातात.
- चीनने १७७३ गुणांसह सुवर्णपदक तर कझाकस्तानने १७५४ गुणांसह कांस्यपदक मिळवले आहे.
- याशिवाय भारताच्या २ खेळाडू वैयक्तिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. यामध्ये तिलोत्तमा तिसऱ्या आणि विदर्सा वैयक्तिक पात्रता फेरीत सहाव्या स्थानावर विराजमान झाल्या आहेत.
पदकधारक देश:
- १. चीन - सुवर्ण पदक
- २. भारत - रौप्य पदक
- ३. कझाकस्तान - कांस्य पदक