भारताच्या सुरुची सिंग आणि कमलजीत यांनी नुकतेच दक्षिण कोरियाचा पराभव करून आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
ठळक मुद्दे:
- या विजायासोबतच ४८४.६ गुणांसह भारताने आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे.
- हा विजय मिळवल्यामुळे ऐची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाजांनी नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे.
- अंतिम फेरीत भारतीय नेमबाजांनी दक्षिण कोरिया आणि इराणला मागे टाकत आशियाई विक्रम नोंदवला.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जिंकलेले हे दुसरे सुवर्णपदक होते.
१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेतील विजेते (देश-प्राप्त गुण-प्राप्त पदक):
- १. भारत (४८४.६ गुण) - सुवर्ण पदक
- २. दक्षिण कोरिया (४७८.० गुण) - रौप्य पदक
- ३. इराण (४१५.८ गुण) - कांस्य पदक