नुकतेच अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित पहिल्या 'कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप (Commonwealth Kabaddi Championship) २०२६' मध्ये भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले आहे.
ठळक मुद्दे:
- अहमदाबाद येथील 'वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स'मध्ये पार पडलेल्या या पहिल्या 'कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप २०२६' मध्ये भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत अजिंक्यपद मिळवले आहे.
- अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाने श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.
- भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात युगांडावर विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
'कॉमनवेल्थ कबड्डी चॅम्पियनशिप २०२६' बाबत महत्वपूर्ण माहिती:
- 'अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया' (AKFI) द्वारे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
- संकल्पना /थीम (Theme): 'एक श्वास. एक रेड. एक कॉमनवेल्थ. (One Breath. One Raid. One Commonwealth.)' ही या स्पर्धेची संकल्पना आहे.