नुकतेच भारताने महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून विक्रमी आठवे विजेतेपद पटकावले आहे.
ठळक मुद्दे:
- भारताने महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात १८३/५ अशी धावसंख्या उभारून श्रीलंकेचा पराभव करत महिला आशिया चषकाचे विक्रमी आठवे विजेतेपद आपल्या नावावर कोरले आहे.
- भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला ही विशेष बाब आहे.
- शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली.
- त्यासोबतच भारतीय फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचे आव्हान मोडून काढले.
- २०२४ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतरचा हा विजय भारतीय संघासाठी वचपा काढल्यासामान होता.
विशेष कामगिरी - एक कटाक्ष:
- शेफालीने आक्रमक फलंदाजी करत केवळ २४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना ती महिला टी-२० आशिया चषकाच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकणारी खेळाडू ठरली.
- तिचे हे २१ वे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक होते तसेच या स्पर्धेतील तिसरे आणि सलग डावांमधील दुसरे अर्धशतक ठरले.
- स्मृती मानधनानेही आक्रमक पवित्रा घेत ३५ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.
- शेफाली आणि स्मृती यांची ही सहावी शतकी भागीदारी ठरली.