संरक्षण सहकार्य बळकट करण्यासाठी भारत आणि थायलंड यांच्यामध्ये संयुक्त लष्करी सराव 'मैत्री-XV' (MAITREE-XV) सुरू झाला आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय लष्कराचे पथक थायलंड येथे आयोजित भारत-थायलंड संयुक्त वार्षिक लष्करी सराव 'मैत्री-XV' च्या १५ व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.
- १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सदर सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
- दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य, परस्पर कार्यक्षमता आणि संयुक्त परिचालन क्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.
- भारतीय लष्कर आणि रॉयल थाई आर्मीमधील हा सराव दोन्ही दलांमधील समन्वय, परस्पर सामंजस्य आणि परिचालन सज्जता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतो.