भारतामार्फत नुकतीच उत्तर प्रदेशातील अमेठी येथील केंद्रावर पहिल्या १००% स्वदेशी AK-203 ‘शेर (Sher)’ असॉल्ट रायफलची (Assault Rifle) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यातील कोरवा येथे स्थित 'इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत (Indo-Russian Rifles Private Limited - IRRPL)' संपूर्णतः स्वदेशी घटक आणि साहित्याचा वापर करून बनवलेल्या पहिल्या १००% स्वदेशी AK-203 ‘शेर’ असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
- 'आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat)' च्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या प्रोटोटाइप (नमुना) कडे पाहिले जात असून यामुळे भारतीय लष्करासाठी AK-203 उत्पादन कार्यक्रमाच्या स्थानिकीकरणाला चालना मिळाली आहे.
AK-203 ‘शेर’ असॉल्ट रायफलबाबत महत्वपूर्ण माहिती:
- 7.62×39 मिमी काडतुसाचा वापर करणारी AK-203 ही कलाश्निकोव्ह AK-100 मालिकेतील गॅस-ऑपरेटेड आणि मॅगझिन-फेड असॉल्ट रायफल आहे.
- या रायफलचा गोळ्या झाडण्याचा वेग (firing rate) प्रति मिनिट सुमारे ७०० राउंड्स इतका असून त्याचा प्रभावी पल्ला ८०० मीटरपर्यंत आहे.
- बॅरलची लांबी ४१५ मिमी असून यात ॲडजस्टेबल फोल्डिंग स्टॉकची सुविधा तसेच ऑप्टिक्स आणि इतर ॲक्सेसरीज बसवण्याची तरतूदही आहे.
- ही रायफल इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टम (INSAS) रायफलची जागा घेण्यासाठी तयार करण्यात आली असून सप्टेंबर २०२६ मध्ये भारतीय सशस्त्र दलांच्या चाचण्यांसाठी ती सुपूर्द केली जाईल.
- हा भारत आणि रशिया यांच्यातील संयुक्त उपक्रम असून त्याची स्थापना २०१९ मध्ये 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत AK-203 असॉल्ट रायफल्सचे स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासाठी करण्यात आली होती.