नुकतीच ओडिशामधील चांदीपूर येथून 'अग्नी-४' या मध्यम-पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथील 'एकात्मिक चाचणी केंद्रावरून' (Integrated Test Range - ITR) 'अग्नी-४' या मध्यम-पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (Medium-Range Ballistic Missile - MRBM) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
  • सदर क्षेपणास्त्र चाचणी 'सामरिक बल कमांडद्वारे' (Strategic Forces Command - SFC) 'संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (Defense Research and Development Organization - DRDO) यांच्या सहकार्याने घेण्यात आली.

'अग्नी-४' क्षेपणास्त्राविषयी थोडक्यात माहिती:

  • 'अग्नी-४' हे स्वदेशी बनावटीचे, २ टप्प्यांचे (two-stage), जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे मध्यम-पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे.
  • याला गती देण्याकरिता 'घन-इंधन रॉकेट मोटर्स'चा (solid-fuel rocket motors) वापर केला जातो. 
  • हे क्षेपणास्त्र सुमारे ४,००० किलोमीटर अंतरापर्यंत १,००० किलोग्रॅमपर्यंतचे भार (payload) वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
  • याचे वजन सुमारे १७,००० किलोग्रॅम, लांबी सुमारे २० मीटर आणि खालच्या टप्प्यावरील व्यास सुमारे १.२ मीटर इतका आहे.