नुकताच भारत आणि श्रीलंका यांच्यातील १३ वा 'श्रीलंका-इंडिया नेव्हल एक्सरसाइज (SLINEX-26)' सागरी सराव विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे संपन्न झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • १७ ते २१ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश (AP) येथे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय नौदल आणि श्रीलंका नौदल यांनी 'श्रीलंका-इंडिया नेव्हल एक्सरसाइज (SLINEX-26)'
  • यंदा २०२६ सालची या वार्षिक द्विपक्षीय सागरी सरावाची १३ वी आवृत्ती होती.
  • दोन्ही नौदलांमधील सागरी सहकार्य, परस्पर कार्यक्षमता तसेच परस्पर सामंजस्य बळकट करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

सरावाची पार्श्वभूमी: 

  • २००५ मध्ये 'स्लिनेक्स' (SLINEX) सरावाची संकल्पना मांडण्यात आली होती.
  • १४ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे या सरावाची १२ वी आवृत्ती 'स्लिनेक्स-२५ (SLINEX-25)' आयोजित करण्यात आली होती.

'स्लिनेक्स २०२६ (SLINEX 2026)' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • भारतीय नौदलामार्फत स्वदेशी बनावटीची 'अँटी-सबमरीन वॉरफेअर' (ASW) कॉर्व्हेट 'आयएनएस कवरत्ती'आणि 'फ्लीट टँकर' 'आयएनएस ज्योती' यांच्यासह या सरावात सहभाग नोंदवण्यात आला होता.
  • श्रीलंका नौदलामार्फत 'एसएलएनएस सिंदुराला' या जहाजाद्वारे प्रतिनिधित्व करण्यात आले होते.