नुकताच भारत-सिंगापूर द्विपक्षीय सागरी सराव 'सिम्बॅक्स (SIMBEX)-२६' ची ३३ वी आवृत्ती आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे:
- या सरावात भारतीय नौदल आणि सिंगापूर प्रजासत्ताक नौदल यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
- सदर सराव हा २१ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
- इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सहकार्य आणि सुरक्षा बळकट करणे या मुख्य उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.