भारत नुकताच 'स्वीडिश जागतिक व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण (Swedish Global Business Climate Survey)'मध्ये प्रथम क्रमांकावर विराजमान झाला आहे.
ठळक मुद्दे:
- जवळपास ४१ बाजारपेठांचा 'स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडिया (Swedish Chamber of Commerce)'च्या 'जागतिक व्यावसायिक वातावरण सर्वेक्षण' २०२६ मध्ये आढावा घेतल्यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.
- यानुसार व्यावसायिक वातावरणाच्या दृष्टीने सर्वोत्तम बाजारपेठ म्हणून भारताची निवड करण्यात आली आहे.
- केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यामार्फत या मानांकनाचा उल्लेख करण्यात आला आहे.
- सदर सर्वेक्षण हे स्वीडिश कंपन्यांच्या दृष्टिकोनातून प्रमुख निर्यात बाजारपेठांमधील आर्थिक तसेच व्यावसायिक परिस्थितीचे प्रतिबिंब दर्शविण्याचे कार्य करते.