नुकतेच दळणवळण मंत्रालयांतर्गत असलेल्या टपाल विभागामार्फत भारतीय शास्त्रज्ञ आणि बायोगॅस तंत्रज्ञान व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अग्रणी असणाऱ्या राम बख्श सिंग यांच्या सन्मानार्थ ५ रुपये मूल्याचे एक स्मृती टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • सदर टपाल तिकीट श्री. रामदास आठवले (राज्यमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण) तसेच कर्नल अखिलेश कुमार पांडे (मुख्य पोस्टमास्टर जनरल, दिल्ली सर्कल) यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील मंत्र्यांच्या निवासस्थानी संयुक्तपणे प्रकाशित करण्यात आले आहे.
  • 'आधुनिक बायोगॅसचे जनक' म्हणून राम बख्श सिंग ओळखले जातात.
  • त्यांनी १९५७ मध्ये उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे भारतातील पहिल्या यशस्वी 'गोबर गॅस' प्रकल्पांपैकी एकाची सुरुवात केली होती.
  • १९७५ च्या युनायटेड स्टेट्स सिनेट अहवालात तसेच 'मदर अर्थ न्यूज (Mother Earth News)' मध्ये त्यांच्या संशोधनाचा उल्लेख करण्यात आला होता.
  • या स्मृती टपाल तिकिटाच्या प्रकाशन प्रसंगी 'कम्प्लीट गाईड टू बायोगॅस – रिन्यूएबल एनर्जी फ्रॉम वेस्ट: फिचरिंग द लिगसी ऑफ डॉ. राम बख्श सिंग (Complete Guide to Biogas – Renewable Energy from Waste: Featuring the Legacy of Dr Ram Bux Singh)' नावाचे एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले आहे.