फिलिपिन्सच्या मनिला येथे आयोजित १४ व्या 'ईस्ट आशिया समिट – आर्थिक मंत्र्यांची बैठक (East Asia Summit – Economic Ministers’ Meeting - EAS-EMM' आणि २३ व्या 'आसियान (ASEAN)-भारत आर्थिक मंत्र्यांच्या बैठकीत (Association of Southeast Asian Nations (ASEAN)-India Economic Ministers Consultation)' भारताने सहभाग घेतला.

ठळक मुद्दे:

  • २२ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही बैठक संपन्न झाली होती.
  • वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव नितीन कुमार यादव यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.
  • सदर बैठकींमध्ये प्रादेशिक तसेच जागतिक आर्थिक कल, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा आणि प्रादेशिक सहकार्य या विषयांवर चर्चा करण्यात आली.