भारतामार्फत नुकतेच अत्याधुनिक सागरी संशोधन जहाज 'सागर मंथन (Sagar Manthan)' कार्यान्वित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारताने 'ORV सागर मंथन' या अत्याधुनिक संशोधन जहाजाचे कोलकाता येथे अनावरण केले आहे.
  • याकडे सागरी संशोधनातील आपली स्वदेशी क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठी झेप ​​म्हणून पाहिले जात आहे.
  • 'डीप ओशन मिशन (Deep Ocean Mission)' अंतर्गत 'राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रासाठी (National Centre for Polar and Ocean Research - NCPOR)' 'गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्समार्फत (Garden Reach Shipbuilders & Engineers - GRSE)' या प्रगत जहाजाची रचना करण्यात आली आहे.
  • सदर प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ८४० कोटी रुपये इतका आहे.
  • अत्यंत बिकट सागरी परिस्थितीतही हे जहाज काम करण्यास सक्षम आहे. 
  • हवामान बदल, सागरी अभ्यास, खोल समुद्रातील भूगर्भशास्त्र तसेच सागरी विज्ञान या क्षेत्रांतील संशोधनासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.
  • संशोधकांना समुद्राच्या विविध स्तरांवरून माहिती गोळा करण्यास ही प्रणाली मदत करेल अशी अपेक्षा आहे.