भारतामार्फत नुकतीच UNCCD CoP१७ मध्ये गवताळ प्रदेश (Grasslands) आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्था (Other Open Natural Ecosystems - ONEs) यावरील आपली पहिली मार्गदर्शिका (Guide) प्रकाशित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • मंगोलियातील उलानबातर येथे आयोजित या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
  • 'वाळवंटीकरण रोखण्याबाबतच्या संयुक्त राष्ट्र कराराच्या (United Nations Convention to Combat Desertification - UNCCD)'आयोजित 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज' (Conference of the Parties  - COP) च्या १७ व्या सत्रादरम्यान भारत सरकारने भारतातील गवताळ प्रदेश आणि 'इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्था' (ONEs) वरील आपली पहिली मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे.
  • पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली भारतातील गवताळ प्रदेश तसेच खुल्या नैसर्गिक परिसंस्थांचे संवर्धन व शाश्वत व्यवस्थापन यांना चालना देणे या मुख्य उद्देशासाठी ही मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली.
  • केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री श्री. भूपेंद्र यादव यांनी या कार्यक्रमात व्हर्च्युअल) पद्धतीने सहभाग नोंदविला.

भारताच्या गवताळ प्रदेश आणि ONEs वरील पहिल्या मार्गदर्शिकेबद्दल महत्वाची माहिती:

  • सदर मार्गदर्शिका ही मुख्यत्वे भारतातील खुल्या नैसर्गिक परिसंस्थांचे संवर्धन, पुनर्संचय तसेच शाश्वत व्यवस्थापन बळकट करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
  • पारंपरिकरित्या कमी वृक्ष आच्छादनामुळे दुर्लक्षित परिसरांकडे वैज्ञानिक लक्ष वेधणे हा देखील याचा एक महत्वपूर्ण उद्देश आहे.
  • हिमालयीन आणि तराई गवताळ प्रदेशांपासून ते थार आणि बन्नी प्रदेश, दख्खनची सवाना, खडकाळ पठारे, झुडपी वने, किनारपट्टीवरील परिसंस्था तसेच वाळवंटी प्रदेश या भारतातील विविध परिसंस्थांचा समावेश या नवीन मार्गदर्शिकेत आहे. .
  • यामध्ये पशुपालन, अग्नि-परिस्थितिकी आणि कार्बन संचयन असे वैविध्यपूर्ण विषयांवर आधारित विभाग आहेत.