भारत आणि जपान यांच्यात नुकताच राजस्थानमधील जोधपूर येथे 'वीर गार्डियन (Veer Guardian)-२०२६' हा द्विपक्षीय हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- संरक्षण मंत्रालयांतर्गत भारतीय हवाई दल (Indian Air Force - IAF) आणि जपान हवाई आत्मरक्षा दल(Japan Air Self-Defence Force - JASDF) यांच्यामार्फत 'वीर गार्डियन-२०२६' या द्विपक्षीय हवाई सरावाची दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे.
- ९ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत १४ दिवस चालणारी सदर आवृत्ती ही राजस्थानमधील जोधपूर हवाई दल तळावर आयोजित करण्यात आली आहे.
- दोन्ही हवाई दलांमधील परस्पर कार्यक्षमता, सामरिक कौशल्य तसेच समन्वय वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.
'वीर गार्डियन-२०२६' सराव ठळक वैशिष्ट्ये:
- सराव पार्श्वभूमी: भारत आणि जपान यांच्यातील हवाई लढाऊ सरावाचा 'वीर गार्डियन-२०२६' हा दुसरा टप्पा असून यापूर्वी जपानमध्ये २०२३ मध्ये याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.
- भारत सहभाग: स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमाने 'तेजस' तसेच 'सु-३० एमकेआय' (Su-30 MKI) आणि 'राफेल' (Rafale) इ. विमानांसह भारतीय हवाई दल यामध्ये सहभागी होत आहे.
- जपान सहभाग: जपान हवाई आत्मरक्षा दल हे 'एफ-२ए (F-2A)' लढाऊ विमानांसह सहभागी होत आहे.
IAF बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-Form): IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.
- स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी IAF ची स्थापना करण्यात आली होती.
- बोधवाक्य (Motto): 'नभः स्पृशं दीप्तम्' (Touch the Sky with Glory) हे भारतीय हवाई दलाचे बोधवाक्य आहे.
- मुख्यालयाचे ठिकाण: IAF मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.
- सर्वोच्च कमांडर: भारताचे राष्ट्रपती हे भारतीय हवाई दलाचे सर्वोच्च कमांडर असतात.
- सध्याचे वायुसेना प्रमुख: एअर चीफ मार्शल (Air Chief Marshal) अमर प्रीतसिंग हे सध्याचे वायुसेना प्रमुख आहेत.
- वायुसेना दिन साजरा: ८ ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करण्यात येतो.