भारताकडून नुकतीच उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे ब्रिक्स (BRICS) देशांच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयांच्या (National Statistical Offices - NSOs) प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली.
ठळक मुद्दे:
- कालावधी: भारताने ३-४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सदर बैठक आयोजित केली.
- बैठकीची थीम: 'बदलाचे वाहक म्हणून दर्जेदार सांख्यिकी' (Quality Statistics as a Driver of Change) ही या बैठकीची थीम होती.
BRICS बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-form): BRICS हे नाव Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.
- वैशिष्ट्य: ही जगातील प्रगतशील तसेच वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश असणारी एक प्रसिद्ध आणि तितकीच अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- दक्षिण आफ्रिकेचा समावेश: सुरुवातीला Brazil, Russia, India आणि China इतकेच देश असल्याने BRIC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात २०१० साली South Africa समाविष्ट झाला आणि याचे नाव BRICS असे पडले.
- स्थापनेमागची संकल्पना: Goldman Sachs चे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असणाऱ्या जिम ओ'नील यांच्या डोक्यातून या संघटनेची स्थापना करण्याची संकल्पना आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: ब्रिक्सचे (BRICS) कोणतेही एक कायमस्वरूपी मुख्यालय नाही. BRICS ची मुख्य वित्तीय संस्था असणाऱ्या 'न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (New Development Bank)' कायमस्वरूपी मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे.