भारतामार्फत नुकतेच नवी दिल्ली येथे 'ब्रिक्स मुख्य न्यायमूर्तींच्या मंचाचे (BRICS Chief Justices’ Forum)'आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे:
- ४ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नवी दिल्ली (दिल्ली) येथे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court - SC) 'ब्रिक्स मुख्य न्यायमूर्तींच्या मंचाचे (BRICS Chief Justices’ Forum)' आयोजन केले होते.
- या दरम्यान १० देशांमधील न्यायव्यवस्थेच्या प्रमुख नेत्यांशी भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India - CJI) सूर्यकांत यांनी द्विपक्षीय बैठका घेतल्या.
- न्यायालयीन सहकार्य, सामंजस्य करार, मध्यस्थी तसेच लवाद या विषयांवर प्रामुख्याने यामध्ये चर्चा करण्यात आली आहे.
ब्रिक्सशी संबंधित इतर महत्वाचे कार्यक्रम:
ब्रिक्स विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक (BRICS Science Ministerial Meet):
- चेन्नई, तमिळनाडू येथे १४ वी ब्रिक्स विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक डॉ. जितेंद्र सिंह (केंद्रीय राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
ब्रिक्स क्रीडा मंत्री बैठक (BRICS Sports Ministers’ Meeting):
- विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे ब्रिक्स क्रीडा मंत्री बैठक डॉ. मनसुख मांडविया (केंद्रीय मंत्री, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे.
महासागर आणि ध्रुवीय विज्ञानावरील ब्रिक्स कार्यगटाची बैठक (BRICS WG Meeting on Ocean and Polar Science):
- गोवा येथे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 'महासागर आणि ध्रुवीय विज्ञान व तंत्रज्ञान' विषयावरील ब्रिक्स कार्यगटाच्या ८ व्या बैठकीचे आयोजन केले होते.
ब्रिक्स शैक्षणिक मंच (BRICS Academic Forum):
- भारताने लखनऊ, उत्तर प्रदेश येथे 'लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी' (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability) या संकल्पनेवर आधारित १८ व्या ब्रिक्स शैक्षणिक मंचाचे आयोजन केले होते.
BRICS बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-form): BRICS हे नाव Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.
- वैशिष्ट्य: ही जगातील प्रगतशील तसेच वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश असणारी एक प्रसिद्ध आणि तितकीच अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
- स्थापना वर्ष: १६ जून २००९ रोजी BRICS ची स्थापना करण्यात आली होती.
- दक्षिण आफ्रिकेचा समावेश: सुरुवातीला Brazil, Russia, India आणि China इतकेच देश असल्याने BRIC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात २०१० साली South Africa समाविष्ट झाला आणि याचे नाव BRICS असे पडले.
- स्थापनेमागची संकल्पना: Goldman Sachs चे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असणाऱ्या जिम ओ'नील यांच्या डोक्यातून या संघटनेची स्थापना करण्याची संकल्पना आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: ब्रिक्सचे (BRICS) कोणतेही एक कायमस्वरूपी मुख्यालय नाही. BRICS ची मुख्य वित्तीय संस्था असणाऱ्या 'न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (New Development Bank)' कायमस्वरूपी मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे.