नुकतेच भारतामार्फत केरळमधील कोची येथे 'इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटी (International Coconut Community - ICC)' च्या ६२ व्या सत्राचे आणि मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे:
- १७ ते २० नोव्हेंबर २०२६ दरम्यान केरळमधील कोची येथे या सत्राचे आणि मंत्रिस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.
- ४ दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गत असणाऱ्या 'कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड (Coconut Development Board)' आणि जकार्ता (इंडोनेशिया) येथे मुख्यालय असलेल्या 'इंटरनॅशनल कोकोनट कम्युनिटी (International Coconut Community)' यांनी संयुक्तपणे केले होते.
- सदर बैठकीचे उद्घाटन श्री. राम नाथ ठाकूर (केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री) यांच्या हस्ते झाले
- तर भारत सरकारच्या कृषी सचिव, अतिश चंद्र यांनी उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद भूषवले.
सर्वाधिक नारळ उत्पादन करणारे देश (ICC, २०२४):
- १. भारत
- २. इंडोनेशिया
- ३. फिलीपिन्स
सर्वाधिक नारळ उत्पादन करणारी राज्ये (कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, २०२५-२६):
- १. तामिळनाडू
- २. केरळ
- ३. कर्नाटक