भारतामार्फत नुकतेच नवी दिल्ली येथे पहिल्या 'बिम्स्टेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation - BIMSTEC)' गृहमंत्री स्तरावरील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भारतामार्फत नवी दिल्ली येथे BIMSTEC च्या गृहमंत्री स्तरावरील पहिल्या बैठकीचे (Home Ministers’ Meeting) आयोजन करण्यात आले आहे.
  • अमित शहा यांनी बैठकीला संबोधित करताना मुख्यतः ५ प्राधान्य क्षेत्रांवर प्रकाश टाकला.

बैठकीतील प्रमुख प्राधान्य क्षेत्रे:

  • अमली पदार्थ नियंत्रण
  • दहशतवादविरोधी उपाय आणि कायदेशीर सहकार्य
  • फरार गुन्हेगारांचे प्रत्यार्पण
  • सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांचा तपास
  • संस्थात्मक सहकार्य आणि क्षमता बांधणी