नुकतेच १२ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीदरम्यान भारताने नवी दिल्ली येथे १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले आहे.

ठळक मुद्दे:

  • भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते.
  • परिषदेची संकल्पना/ थीम (Theme): 'लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी (Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability)' ही यंदाच्या या परिषदेची थीम होती.
  • यापूर्वी भारताने २०१२, २०१६ आणि २०२१ साली या परिषदेचे यजमानपद भूषवले होते.
  • यंदाची २०२६ ची ही शिखर परिषद म्हणजे भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा चौथा कार्यकाळ होता.

BRICS बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full-form): BRICS हे नाव Brazil, Russia, India, China आणि South Africa या देशांच्या नावांच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.
  • वैशिष्ट्य: ही जगातील प्रगतशील तसेच वेगाने वृद्धिंगत होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांचा समावेश असणारी एक प्रसिद्ध आणि तितकीच अशी महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
  • स्थापना वर्ष: १६ जून २००९ रोजी BRICS ची स्थापना करण्यात आली होती.
  • दक्षिण आफ्रिकेचा समावेश: सुरुवातीला Brazil, Russia, India आणि China इतकेच देश असल्याने BRIC म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गटात २०१० साली South Africa समाविष्ट झाला आणि याचे नाव BRICS असे पडले.
  • स्थापनेमागची संकल्पना: Goldman Sachs चे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ असणाऱ्या जिम ओ'नील यांच्या डोक्यातून या संघटनेची स्थापना करण्याची संकल्पना आली होती. 
  • मुख्यालयाचे ठिकाण: ब्रिक्सचे (BRICS) कोणतेही एक कायमस्वरूपी मुख्यालय नाही. BRICS ची मुख्य वित्तीय संस्था असणाऱ्या 'न्यू डेव्हलपमेंट बँकेचे (New Development Bank)' कायमस्वरूपी मुख्यालय चीनमधील शांघाय येथे आहे.