गुजरातमधील कांडला येथे २,३०० कोटी रुपये खर्चाचा भारताचा पहिला बंदराआधारित ई-मिथेनॉल प्रकल्प (Port-Based E-Methanol Plant) उभारला जाणार आहे.
ठळक मुद्दे:
- गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथील कांडला स्थित दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटी येथे भारताच्या पहिल्या बंदराधारित ई-मिथेनॉल उत्पादन प्रकल्पाची अधिकृतपणे पायाभरणी करण्यात आली आहे.
- श्री. सर्बानंद सोनोवाल (केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री) यांनी गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्र पटेल आणि आसामचे मुख्यमंत्री डॉ.श्री. हिमंता बिस्वा सरमा यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे.
- भारताच्या हरित सागरी इंधनाचा जागतिक पुरवठादार बनण्याच्या प्रवासातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
- सदर प्रकल्पासाठी आवश्यक भांडवल अनुक्रमे ७६:२४ या प्रमाणात DPA आणि APCL यांच्याकडून पुरवले जाईल.