नुकतीच नीती आयोगाने WRI इंडियाच्या भागीदारीत सुरू केलेल्या 'भारतीय विद्युत गतिशीलता निर्देशांक (India Electric Mobility Index - IEMI) २०२५' मध्ये विद्युत गतिशीलतेकडे होणाऱ्या भारताच्या वाटचालीत दिल्ली ८४ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • ही या अहवालाची दुसरी आवृत्ती होती.
  • नीती आयोगाच्या IEMI क्रमवारीत दिल्ली अव्वल स्थानावर असून त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो.
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक ही फक्त २ मोठी राज्ये 'अव्वल कामगिरी करणाऱ्या (Top Performers)' श्रेणीमध्ये आहेत.
  • सदर यादीमध्ये मणिपूरने डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ४६ गुणांसह अव्वल स्थान पटकाविले आहे.
  • या आवृत्तीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार, चार्जिंग पायाभूत सुविधांची सज्जता तसेच संशोधन या आधारावर सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

निर्देशांकमधील अव्वल कामगिरी करणारी राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि प्राप्त गुण:

  • १. दिल्ली (८४ गुण)
  • २. महाराष्ट्र (७८ गुण)
  • ३. कर्नाटक (७३ गुण)
  • ४. चंदीगड (७१ गुण)
  • ५. गोवा (६५ गुण)

'भारतीय विद्युत गतिशीलता निर्देशांक' बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • विद्युत गतिशीलतेला चालना देण्याबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करणार हा एक निर्देशांक आहे.
  • नीती आयोग आणि WRI इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेला हा IEMI निर्देशांक ३ प्रमुख विषयांतर्गत १६ निकषांचे विश्लेषण करून भारतातील एकूण ३६ प्रदेशांचे मूल्यांकन करतो.
  • या ३ प्रमुख विषयांमध्ये 'वाहतुकीचे विद्युतीकरण, चार्जिंग सज्जता आणि संशोधन आणि नवोपक्रम' यांचा समावेश होतो.