नुकताच भारताचा कृत्रिम सूर्य प्रकल्प 'SST (Steady State Superconducting Tokamak) - 1' गांधीनगर, गुजरात येथील 'प्लाझ्मा संशोधन संस्थेमध्ये (Institute for Plasma Research - IPR)' कार्यरत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • गुजरात येथील SST-1 टोकामाकवर गायरोट्रॉन स्थापित करून भारताने अणु संलयन संशोधनात प्रगती करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
  • सूर्य प्रज्वलित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेप्रमाणे अणु संलयन ऊर्जा तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या आपल्या मोहिमेत भारताने आणखी एक मजल मारली आहे.
  • या गायरोट्रॉन स्थापनेमुळे संशोधनाच्या उद्देशाने प्लाझ्माला अत्यंत उच्च तापमानात गरम करण्याची तसेच टिकवून ठेवण्याची भारताची क्षमता सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

'भारताचा कृत्रिम सूर्य'बाबत थोडक्यात माहिती:

  • 'भारताचा कृत्रिम सूर्य' ही संज्ञा म्हणजे वास्तविक पाहता हा काही कृत्रिम सूर्य नसून प्रत्यक्षात भारतातील अणु संलयन अभ्यास आहे. 
  • SST-1 हा भारतातील एक प्रायोगिक अणु संलयन अणुभट्टी असून तो अणु संलयन ऊर्जा प्रक्रियेसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशाने तयार करण्यात आला आहे.

SST-1 बाबत महत्वाची माहिती:

  • SST-1 अर्थात 'स्टेडी स्टेट सुपरकंडक्टिंग टोकामाक (Steady State Superconducting Tokamak)' हा भारतातील अणु संलयन अभ्यासासाठी तयार करण्यात आलेला एक प्रायोगिक टोकामाक आहे. 
  • यामध्ये डोनट-आकाराच्या चेंबरमध्ये अत्यंत उष्ण प्लाझ्माला मर्यादित ठेवण्यासाठी चुंबकीय क्षेत्रांचा वापरकरण्यात येतो.