नुकताच भारत-इंडोनेशिया यांच्या दरम्यानच्या संयुक्त विशेष दल सराव 'गरुड शक्ती (Garuda Shakti) २०२६' ची ११ वी आवृत्ती इंडोनेशियामध्ये सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे:
- भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे आणि दोन्ही देशांच्या विशेष दलांमधील कार्यात्मक परस्पर समन्वय सुधारणे या मुख्य उद्देशांसाठी हा सराव सुरू करण्यात आला आहे.
- या सरावाची यंदाची २०२६ सालची ११ वी आवृत्ती इंडोनेशियातील बान्युवांगी येथे सुरू झाली आहे.
- सदर सराव हा २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
- भारतीय तुकडीमध्ये पॅराशूट रेजिमेंटच्या (विशेष दल) जवानांचा समावेश असून इंडोनेशियाच्या तुकडीमध्ये त्यांच्या विशेष दलातील जवानांचा समावेश करण्यात आला आहे.