नुकतीच पॅरिस, फ्रान्स येथे 'आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषद (International Space Summit) २०२६' संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे:

  • पॅरिसमधील फ्रान्स येथे ९-१० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पहिली 'आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषद २०२६' आयोजित करण्यात आली होती.
  • इमॅन्युएल मॅक्रॉन (फ्रान्स राष्ट्राध्यक्ष) यांच्या यजमानपदाखाली तसेच जर्मनीच्या भागीदारीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
  • अंतराळ क्षेत्रातील विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी सर्वसमावेशक संवाद साधणे हा या अंतराळ परिषदेचा मुख्य उद्देश होता.
  • जवळपास ९० देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
  • विविध राष्ट्रांचे प्रमुख, अंतराळ संस्था तसेच वैज्ञानिक संस्था यांचा यामध्ये समावेश होता.

'आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषद २०२६' बाबत थोडक्यात माहिती:

मुख्य भर देण्यात आलेले विषय /संकल्पना (Themes):

  • जागतिक स्तरावरील अंतराळ अर्थव्यवस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे
  • विज्ञान आणि अंतराळ संशोधनाला चालना देणे
  • संवाद आणि संरक्षण भागीदारी अंतराळ सुरक्षा सुनिश्चित करणे

मुख्य करार आणि घोषणा:

  • सुमारे २० अब्ज युरो मूल्याच्या जवळपास एकूण ५१ घोषणा या परिषदेत करण्यात आल्या.

भारत-फ्रान्स करार:

  • भारत आणि फ्रान्सने या परिषदेदरम्यान अंतराळ तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यासाठी ३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • उपग्रह प्रक्षेपण आणि पाळत ठेवणाऱ्या यंत्रणा यांचा यामध्ये समावेश आहे.