नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत (Indian Space Research Organization - ISRO) श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून GSLV-F18 द्वारे NVS-03 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • ISRO ने श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण मंचावरून (SLP) GSLV-F18 या जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईकलद्वारे आपल्या पुढच्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रहाचे (NVS-03) यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
  • हे मिशन म्हणजे GSLV चे २० वे उड्डाण आहे.
  • सदर प्रक्षेपणामुळे भारताची स्वदेशी 'नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (Navigation with Indian Constellation - NavIC)' प्रणाली पुन्हा एकदा ४ उपग्रहांच्या किमान कार्यात्मक संरचनेपर्यंत (Operational Configuration) पोहोचली आहे.

NVS-03 उपग्रहाबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • हा इस्रोच्या दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन मालिकेतील तिसरा उपग्रह आहे.
  • सदर उपग्रह हा भारताच्या स्वदेशी 'NavIC' प्रणालीची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करणे, तिची कार्यक्षमता सुधारणे आणि क्षमता वाढविणे या मुख्य उद्देशांसाठी डिझाइन करण्यात आला आहे.
  • या मोहिमेसाठी थॉमस कुरियन यांनी GSLV प्रकल्प संचालक आणि मिशन संचालक म्हणून काम पाहिले आहे.

ISRO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ISRO म्हणजेच Indian Space Research Organization अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
  • स्थापना वर्ष: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक येथे ISRO चे मुख्यालय स्थित आहे.
  • ध्येयवाक्य (Motto): 'मानवजातीच्या सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान (Space technology in the service of humankind)' हे ISRO चे ध्येयवाक्य आहे.
  • प्रमुख प्रक्षेपण केंद्र: सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre - SDSC), श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश हे ISRO चे प्रमुख प्रक्षेपण केंद्र आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या व्ही. नारायणन हे ISRO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.