भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमार्फत (Indian Space Research Organization - ISRO) नुकतीच तामिळनाडू येथील महेंद्रगिरी येथे २२० किलोन्यूटन (kN) थ्रस्टवर सीई२० (CE20) क्रायोजेनिक इंजिनची हॉट टेस्ट यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • इस्रोमार्फत प्रक्षेपण यान मार्क-३ (Launch Vehicle Mark - LVM3) मोहिमेसाठी सीई२० (CE20) क्रायोजेनिक इंजिनची कार्यक्षमता प्रमाणित करणे आणि मोहिमेची क्षमता वाढविणे या उद्देशांसाठी २२० किलोन्यूटन (kN) थ्रस्टवर उड्डाण स्वीकृती हॉट टेस्ट (Flight acceptance hot test) यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे.
  • ही चाचणी तामिळनाडू येथील महेंद्रगिरी येथे आयोजित करण्यात आली होती.

सीई२० (CE20) क्रायोजेनिक इंजिन चाचणीबाबत महत्वाची माहिती:

  • सीई२० (CE20) हे एक स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन असून ते द्रव ऑक्सिजन आणि द्रव हायड्रोजन प्रणोदकांचा वापर करते.
  • उच्च-कार्यक्षमतेने अप्पर-स्टेजवर कार्य करण्यासाठी सदर इंजिन अवजड भार वाहून नेणाऱ्या मोहिमांमध्ये तयार करण्यात आले आहे.
  • एलव्हीएम३ (LVM3) हे भारताचे अवजड भार वाहून नेणारे प्रक्षेपण यान असून त्याच्या सुधारित सी३२ (C32) स्टेजमध्ये पेलोड क्षमता सुधारण्यासाठी २२० किलोन्यूटन (kN) थ्रस्ट असलेले सीई२० (CE20) इंजिन समाविष्ट करण्यात आले आहे.

ISRO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ISRO म्हणजेच Indian Space Research Organization अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
  • स्थापना वर्ष: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक येथे ISRO चे मुख्यालय स्थित आहे.
  • ध्येयवाक्य (Motto): 'मानवजातीच्या सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान (Space technology in the service of humankind)' हे ISRO चे ध्येयवाक्य आहे.
  • प्रमुख प्रक्षेपण केंद्र: सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre - SDSC), श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश हे ISRO चे प्रमुख प्रक्षेपण केंद्र आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या व्ही. नारायणन हे ISRO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.