भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत (Indian Space Research Organization - ISRO) नुकतेच श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून GSLV-F17 द्वारे भारताच्या पहिल्या भू-समकालिक प्रतिमा-निर्मिती उपग्रह (Geosynchronous Imaging Satellite) 'EOS-05' चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • ISRO ने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण मंचावरून GSLV-F17 रॉकेटद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह 'EOS-05' चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
  • 'EOS-05' हा भू-समकालिक कक्षेतून कार्य करणारा भारताचा पहिलाच प्रतिमा-निर्मिती उपग्रह आहे.
  • भारताच्या पृथ्वी निरीक्षण कार्यक्रमातील अशी ही एक महत्त्वपूर्ण घटना ठरली असून भारताची भू-समकालिक प्रतिमा-निर्मिती क्षमता अधिक बळकट झाली आहे.

'EOS-05' प्रक्षेपण मोहिमेविषयी थोडक्यात महत्वाची माहिती:

  • GSLV-F17 या ५१.७ मीटर उंचीच्या रॉकेटने २,३६७ किलोग्रॅम वजनाच्या 'EOS-05' उपग्रहाला 'उप-भू-समकालिक स्थानांतरण कक्षेमध्ये (Sub-Geosynchronous Transfer Orbit - Sub-GTO)' स्थापित केले.
  • या कक्षेचे पृथ्वीपासूनचे सर्वात कमी (Perigee) अंतर १७१ किमी आणि पृथ्वीपासूनचे सर्वात जास्त अंतर (Apogee) ३१,२६० किमी इतके होते.
  • यानंतर उपग्रहाला सुमारे ३६,००० किलोमीटर उंचीवरील त्याच्या अंतिम भू-समकालिक कक्षेत (Final geosynchronous orbit) नेण्यात येईल.
  • उड्डाण-वेळचे वजन ४२०.५ टन असणारे GSLV-F17 हे ३ टप्प्यांचे रॉकेट आहे.
  • हे रॉकेट भारताच्या 'जड उपग्रह वाहून नेण्याच्या प्रक्षेपण तंत्रज्ञानातील (Heavy-lift launch technology)' प्रगती दर्शवते.

ISRO बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ISRO म्हणजेच Indian Space Research Organization अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
  • स्थापना वर्ष: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक येथे ISRO चे मुख्यालय स्थित आहे.
  • ध्येयवाक्य (Motto): 'मानवजातीच्या सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान (Space technology in the service of humankind)' हे ISRO चे ध्येयवाक्य आहे.
  • प्रमुख प्रक्षेपण केंद्र: सतीश धवन अंतराळ केंद्र (Satish Dhawan Space Centre - SDSC), श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश हे ISRO चे प्रमुख प्रक्षेपण केंद्र आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या व्ही. नारायणन हे ISRO च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.