नुकतीच IPS अधिकारी संजुक्ता पराशर यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force - CRPF) कोब्रा (Commando Battalion for Resolute Action - CoBRA) युनिटच्या पहिल्या महिला महानिरीक्षक (Inspector General - IG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • या नियुक्तीमुळे त्या या विशिष्ट 'जंगलातील युद्धतंत्रावर आधारित' दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
  • त्यांनी नवी दिल्ली येथील १०-बटालियन असलेल्या कोब्रा सेक्टर मुख्यालयात महानिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
  • त्यांनी १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी दानेश राणा यांची जागा घेतली.

संजुक्ता पराशर यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • संजुक्ता पराशर या आसाम-मेघालय कॅडरच्या २००६ च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.
  • एकंदरीत बंडखोरीविरोधी मोहिमांमध्ये आघाडीवर राहून जबरदस्त काम केल्यामुळे त्या 'आसामची आयर्न लेडी (Iron Lady of Assam)' म्हणून सुप्रसिद्ध आहेत.
  • यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (National Investigation Agency - NIA) उपमहानिरीक्षक पदावर काम केले आहे
  • याव्यतिरिक्त आसाम पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे (Criminal Investigation Department - CID) नेतृत्व केले आहे.

प्राप्त पुरस्कार:

  • 'प्रशिक्षणातील उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक (Union Home Minister’s Medal for Excellence in Training)' (वर्ष: २०२२)