'भारतीय ऑलिम्पिक संघटनेमार्फत (Indian Olympic Association - IOA)' नुकतीच राजा रणधीर सिंग आणि जसपाल राणा यांच्या स्मरणार्थ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी कै. राजा रणधीर सिंग (ज्येष्ठ क्रीडा प्रशासक) आणि कै. जसपाल राणा (दिग्गज खेळाडू, नेमबाजी) यांच्या नावाने २ स्मृती पुरस्कारांची घोषणा केली आहे.
- या घोषणेमुळे भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूला 'राजा रणधीर सिंग ट्रॉफी' तसेच सर्वोत्तम महिला खेळाडूला 'जसपाल राणा ट्रॉफी' प्रदान करण्यात येईल.
माजी दिग्गजांबाबत महत्वपूर्ण माहिती:
राजा रणधीर सिंग:
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस म्हणून त्यांनी १९८७ ते २०१२ या काळात २५ वर्षे काम पाहिले होते.
- 'ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (Olympic Council of Asia - OCA)' अध्यक्षपदावरदेखील ते विराजमान होते.
- वयाच्या ७९ व्या वर्षी मे २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले.
जसपाल राणा:
- जसपाल राणा हे भारतीय नेमबाजीचे प्रणेते तसेच पिस्तूल प्रशिक्षक म्हणून सुप्रसिद्ध होते.
- १९९४ सालच्या 'आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (International Shooting Sport Federation - ISSF)' जागतिक नेमबाजी स्पर्धेत त्यांची विशेष कामगिरी राहिली आहे.
- या स्पर्धेत त्यांनी २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.
- त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ९ सुवर्ण पदकांसह एकूण १५ पदके तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत ४ सुवर्ण पदकांसह एकूण ८ पदके जिंकली होती.
- वयाच्या ४९ व्या वर्षी जून २०२६ मध्ये त्यांचे निधन झाले.