नुकतीच 'भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (Indian National Science Academy - INSA)' अध्यक्ष शेखर सी. मांडे यांची संयुक्त राष्ट्रांच्या १०-सदस्यीय 'STI' गटात नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • संयुक्त राष्ट्र (UN) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी INSA अध्यक्ष प्राध्यापक शेखर सी. मांडे यांची शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDGs) विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम (Science, Technology, and Innovation - STI) विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या १०-सदस्यीय गटात नियुक्ती केली आहे.
  • सदर नियुक्ती ही २०२६–२०२८ या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
  • शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी (SDGs) विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम (STI) विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या १०-सदस्यीय गटाबद्दल:
  • २०१५ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या 'टेक्नॉलॉजी फॅसिलिटेशन मेकॅनिझम' (TFM) अंतर्गत हा गट सर्वप्रथम २०१६ मध्ये गठित करण्यात आला होता.
  • यात नागरी समाज, खाजगी क्षेत्र तसेच वैज्ञानिक समुदायातील १० तज्ज्ञांचा समावेश असतो.